लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : महाराष्ट्राचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन काल (दि 11 मार्च) पार पाडलं. या
संपूर्ण काळात विरोधी पक्षनेते यांनी मनसुख हिरेन,
सचिन वाझे प्रकरण लावून धरलं. अनेकवेळा सभागृह बंद पाडलं. त्यामुळे
सरकारला बॅकफूटला जाऊन वाझेंची बदली करावी लागली. यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून
फडणवीसांचं कौतुक होऊ लागलं आहे. परंतु खा. संजय राउत यानी मात्र ‘फडणवीसांनी या मुद्द्यांवर गोंधळ घालण्याऐवजी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर
बोलले असते, त्यांचा अनुभव पणाला असता तर बरं झालं असतं’,
अशा शब्दात त्यांचा समाचार घेतला आहे.
लोकांच्या
जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?
लोकांच्या
जगण्या-मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यानी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते, पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे
विकृत रूप आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींवर चांगली चर्चा करता आली असती व विरोधी
पक्षनेत्यांना त्यांचा अनुभव पणास लावता आला असता. शिक्षण, कायदा
– सुव्यवस्थेचे, इतरही काही प्रश्न
आहेत. अर्थसंकल्पात एक लाख कोटीची महसुली तूट आहे. असे एक ना अनेक प्रश्न राज्याला
भेडसावत आहेत. त्यावर बोलायचे नाही. लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे
विरोधी पक्षाला कधी कळणार?
संसदीय
लोकशाहीत विरोधी पक्षाला जास्त जबाबदारीने वागावे लागते, पण महाराष्ट्रात विरोधी पक्षाला अशा जबाबदारीची जाणीव फारशी दिसत नाही.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवट झाला, पण
सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले? असा सवल खा. संजय राउत यानि केला
आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी आढळली. या गाडीचे
मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यालगतच्या खाडीत सापडला यावरून विरोधी पक्षाने
विधिमंडळात कामकाज होऊ दिले नाही. ही गाडी सचिन वाझे या अधिकाऱ्याच्या ताब्यात
चारेक महिन्यांपासून होती, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते
फडणवीस यांनी केला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना
अटक करावी, अशी विरोधी पक्षाची मागणी आहे. आता सरकारने वाझे
यांची बदली क्राईम ब्रँचमधून केली. यात विरोधक जिंकले असे वाटत असेल तर तो गैरसमज
आहे. असेही राउत यानी म्हट्ले आहे.
0 टिप्पण्या