Ticker

6/Breaking/ticker-posts

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यानां मोठा दिलासा..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

काष्टी:- रब्बी पिकासाठी जीवदान ठरणारे कुकडी  उन्हाळी आवर्तन   खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे दोन दिवस वाढले असून त्यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यानां  मोठा दिलासा मिळणार आहे.  दि. 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन अपुरे आवर्तनातून काही फायदा होणार नसल्याने  आवर्तन किमान दोन-तीन दिवसांनी वाढवून मिळावे अशी मागणी केली होती. पंचायत समितीचे माजी उपसभापती पुरुषोत्तम लगड ,शहाजी हिरवे, राजेश डांगे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी  याबाबतीत मागील महिन्यातच खासदार डॉ. विखे पाटील यांची भेट घेतली. 

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याअभावी पिळे, फळबागा जळून खाक होण्याची शक्याता आहे त्यामुळे शेतकत्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीचा गंभीर्याने विचार करुन डॉ. सुजय विखे पाटील यांनी तात्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत माहिती घेऊन त्यासंदर्भात जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील साहेब यांच्याशी दुरध्वनी वरुन चर्चेअंती कुकडी डावा तीर कालव्यातून  श्रीगोंदा साठी सहा दिवसांचे ऐवजी आठ दिवसाचे आवर्तन करण्याचा निर्णय झाला.  या निर्णयामुळे  तालुक्याला अतिरिक्त 130 एम.सी.एफ.एस.टी पाणी मिळणार असून  ऐन उन्हाळ्यात होणारी शेतकऱ्यांची हेळसांड होणार नाही. 

 श्रेय घेण्याची लाटण्याची दुर्देवी धडपड..

 खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे कुकडीचे आवर्तन दोन दिवस वाढले आहे मात्र तालुक्यातील  स्वयंघोषित पुढारी केवळ पत्रकबाजी करून आपल्या प्रयत्नमुळे झाल्याचे भासवत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी श्रेय घेण्याची धडपड दुर्देवी आहे. - पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश्वर देशमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या