Ticker

6/Breaking/ticker-posts

मिरजगावमध्ये ७ दुकानांसह विनामास्कधारकांवर कारवाई ; सात दिवसांसाठी केले सील



 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 कर्जत:- तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत चाललेला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी  तालुका प्रशासन कमालीचे सतर्क झाले आहे . प्रशासनाने तालुक्यातील नागरिकांना वारंवार आवाहन करूनही त्यांच्या कडून पाहिजे असा योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे काल गुरुवारी सायंकाळी चार वाजता प्रशासन ऍक्शन मोड मध्ये येऊन.  त्यांनी मिरजगावमधील मुख्य बाजारपेठेतील सात व्यवसाईकांवर कारवाई केली.. तर काही दुकाने सील केली आहेत.

जी दुकाने सील केलेली आहेत. ती दुकाने सात दिवसा साठी  बंद ठेवण्यात येणार आहेत तशी कारवाई देखील केलेली आहे. ही कारवाई कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे व गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी केली. अशी माहिती मिरजगाव कामगार तलाठी श्रीमती घुले यांनी दिली. 

तसेच यावेळी मिरजगाव मध्ये वीणा मास्क फिरणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करण्यात आली. यावेळी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे, मिरजगावच्या तलाठी घुले मॅडम, पोलीस कर्मचारी रवींद्र वाघ, जितेंद्र सरोदे उपस्थित होते. प्रशासनाच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे मात्र मास्क न वापरणाऱ्या नागरिकांची व व्यवसाईकांची चांगलीच धांदल उडाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या