महिलादिन : पद्मशाली महिला शक्तीच्या वतीने कष्टकरी महिला विडी कामगारांचा सन्मान
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर : पद्मशाली समाजातील अनेक महिला कष्टकरी विडी कामगार आहेत. त्यांनी प्रचंड मेहनतीच्या बळावर जीवनात यशस्वीपणे वाटचाल केली आहे. आपली पुढील पिढी सक्षम घडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गरीबीवर मात करीत आयुष्यभर कष्टकरी महिला कामगारांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्ताने पद्मशाली युवा शक्ती संचलित पद्मशाली महिला शक्ती व पद्म नादम ढोल-ताशा पथकाच्या वतीने ‘नारी सन्मानपत्र’ देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
पद्मशाली युवा शक्ती व पद्मशाली महिला शक्ती या दोन्ही सामाजिक संस्था पद्मशाली समाजातील युवक व युवतींनी एकत्रित येऊन स्थापन केल्या आहेत. आतापर्यंत या संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करून अनेकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे. समाजासाठी अहोरात्र झटणार्या समाजातील विविध घटकांच्या कार्यास सलाम करीत त्यांना सन्मानित केले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करीत त्यांना उत्साह वाढविला आहे.
पद्मशाली महिला शक्तीच्या वतीने समाजातील वंचित घटकांसाठी व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केेले जाते. ज्या महिलांना पद्मशाली महिला शक्तीच्या या सामाजिक कार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांच्यासाठी नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या