लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे
शिवारातील माहुली घाटात गुजरात येथून भीमाशंकरला देवदर्शनासाठी चाललेल्या
भाविकांच्या वाहनाला रविवार (७ मार्च) हा अपघातात झाला. कार सुमारे सत्तर फूट दरीत
कोसळल्यामुळे या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवानं या विचित्र अपघातात
कोणाचाही मृत्यू झालेला नाही. कारमधील तीन तरुण प्रवासी सुखरूप आहे.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात मधील मितेश कथेरिया (वय ३५),
भार्गव रामोलिया (वय २५), स्नेहल पोकीया (वय
३०) हे तिघे कार ( जी.जे.१६, सी.जी.७३३६) देवदर्शनासाठी
नाशिक-पुणे महामार्गाने भीमाशंकरला निघाले होते. रविवारी सकाळी माहुली घाटातून जात
असताना चालक मितेश याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्ग सोडून सत्तर
फूट खोल दरीत कोसळली. कारचे मोठे नुकसान झाले. तिघेही किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळाल्यावर महामार्ग
पोलीस अरविंद गिरी, साईनाथ
दिवटे, रमेश शिंदे, योगीराज सोनवणे
यांनी अपघातग्रस्तांना तत्काळ मदत केली. जखमींना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये
दाखल केले. यापूर्वी माहुली घाटाच्या परिसरात असेच अनेक अपघात झाले आहे. उतार व
अचानक वळण असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने घाटातील रस्त्यावर
जागोजागी गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
0 टिप्पण्या