Ticker

6/Breaking/ticker-posts

शरद पवार आणि अमित शहांची भेट? राष्ट्रवादीचा इन्कार ; नवाब मलिकांची सारवासारव..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर त्यांच्यात भेट झाल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसनं हे वृत्त फेटाळून लावले आहेत.

एका गुजराती दैनिकानं दिलेल्या वृत्तानुसार शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. तेव्हा त्यांनी या भेटीबाबत सारवासारव करत हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

' शरद  पवार व अमित शहा यांच्यात भेट झाली नाही. प्रफुल्ल पटेल व शरद पवार अहमदाबादहून थेट मुंबईला आले आहेत. त्यांच्यात भेटच झाली नाही,' असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसंच, 'गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्च रोजी रात्री ९. ३० वाजता प्रफुल्ल पटेल व भाजपच्या बड्या उद्योगपतींची भेट झाली. या भेटीवेळी शरद पवार देखील उपस्थित होते. तसंच, शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचं वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्रानं दिली आहे. या भेटीसाठी पवारांनी प्रायव्हेट जेट वापरल्याचा दावाही वृत्तात केला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या