लातुरात
विलासरावांच्या पुतळ्याशेजारी गोपीनाथरावांचा पूर्णाकृती पुतळा
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
लातूर : भाजपचे
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा दोस्ताना संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे.
जिवंतपणी दोघांनीही आपल्या मैत्रीत कधीच अंतर पडू दिलं नाही. मात्र मृत्यूनंतरही
त्यांच्यात अंतर पडत नाही किंबहुना पडणार नाही कारण लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या
पुतळ्याशेजारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेने दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतीभवन आणि
संग्रहालयास जागा उपलब्ध करून देण्याचा एकमुखी ठराव घेतला आहे. त्याच बरोबर दिवंगत
गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारात उभा करण्यासाठी 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे.
0 टिप्पण्या