गारपीटग्रस्त परिसरात प्रताप ढाकणे यांनी पाहणी करून 'कारखान्याकडून केली मदत जाहीर ..
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बोधेगाव : - शेवगाव तालुक्यातील पूर्व बोधेगाव परिसरातील लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे बुद्रुक, शेकटे खुर्द, राणेगाव, नागलवाडी, भागात वादळी वारा व गारपीटने नुकसान झालेल्या भागात केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली .
यावेळी ढाकणे यांनी नुकसानग्रस्त सभासद शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचा हात देऊन कारखान्याकडून प्रत्येकी ४ हजार रुपयांची मदत जाहीर केली . तसेच नुकसान झालेल्या सर्वच शेतक ऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळण्यासाठी पालकमंत्री ना हसन मुश्रीप यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे .
श्री केदारेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रांतील सभासद असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ४००० रुपये तातडीने आर्थिक मदत देण्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी पाहणी दौऱ्यात जाहीर केले . त्यामुळे शेतक ऱ्यांना काहीसा आधार मिळाला असून शासन दरबारी भरीव मदतीसाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले .
या दौऱ्यात केदारेश्वरचे उपाध्यक्ष प्रकाश घनवट, लाडजळगावचे काकासाहेब तहकीक, भाऊसाहेब क्षीरसागर, उपसरपंच दत्ता तहकीक, गहिनीनाथ ढाकणे, तात्यासाहेब मारकंडे, संजय आंधळे, रंगनाथ परदेशी , राजेंद्र मारकंडे, विक्रम ढाकणे, आदी शेतकरी व तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी सहाय्यक सुभाष बारगजे, गजानन चव्हाण,कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ उपस्थितीत होते .
शेवगाव तालुक्यासह पूर्व भागातील लाडजळगाव गोळेगाव, शेकटे खुर्द, शेकटे बुद्रुक, सुकळी, बोधेगाव व आणि पंचक्रोशीत शनिवार वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. पर्जंन्यवृष्टी सुरु असतानाच प्रचंड गारांचा वर्षाव झाला आहे.क्षणार्धात सर्व परिसर पांढरा शुभ्र गारमय झाला होता.सगळीकडे पाणीच पाणी झाले .या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला खरा परंतु बळीराजावर अचानक आस्मानी संकट कोसाळल्यामुळे आणि हाती आलेला घास निसर्गाने हिराऊन घेतल्यामुळे बळीराजा अत्यंत चिंताग्रस्त झाला आहे.
शेतातील काढणीला आलेला गहु,हरभरा,मका,तसेच ऊन्हाळी पिके कांदा, बाजरी भूईमुग उभा ऊस आदी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्याला वर्षभर कोरोनाने छळले आणि आता हाता—तोंडाशी आलेला घास अस्ममानी संकटाने हिराऊन नेला .शेतकर्यांनी कर्ज काढुन आपल्या शेतीत गहु, हरभरा, मका, बाजरी कांदा, व फळबागांचे पिके घेतली होती .ती सर्व पिके काही वेळात भूईसपाट झाली त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.आई खाऊ देईना व बाप भिक मागु देईना अशी स्थिती शेतकर्याची झाली आहे.
शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई सर्व शेतर्यांना दिली पाहिजे अशी मागणी लाडजळगाव येथील प्रगतशिल शेतकरी माजी सरपंच काकासाहेब तहकिक यांनी यावेळी केली .गारपिटीने नूकसान झालेल्या कांदा पिकासाठी बुरशीनाशकांची फवारणी करावी त्यामुळे पिकास थोडी मदत होईल, असे आवाहन कृषी अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे .
0 टिप्पण्या