लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर:-: विळद येथील सुजित जगताप
यांची नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या मान्यतेने विद्यार्थी
काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर यांनी जगताप यांना नियुक्तीचे पत्र
देत त्यांची निवड जाहीर केली आहे.
सुजित जगताप न्यू आर्टस् महाविद्यालयाचे
पदवीचे विद्यार्थी असून ते विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत आहेत. आजवर त्यांनी
विविध सामाजिक उपक्रम,
सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांचे
आयोजन केले आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा
यांच्यामध्ये त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. जगताप निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त
करताना म्हणाले की,
पक्षाने माझ्यावरती विश्वास टाकून मला अध्यक्षपदी काम करण्याच्या
दिलेल्या संधीचा मी विद्यार्थी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी उपयोग करणार आहे. नगर
तालुक्यातील अनेक विद्यार्थी तालुक्यातील वेग वेगळ्या महाविद्यालयांमध्ये तसेच नगर
शहरामध्ये शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने येत असतात. त्यांचे अनेक प्रश्न
असतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा हक्काचा आवाज होण्यासाठी
विद्यार्थी काँग्रेस काम करेल.
जगताप यांच्या निवडीबद्दल त्यांचे महसूल मंत्री ना.
बाळासाहेब थोरात,
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ.डॉ.सुधीर
तांबे, आ.लहू कानडे, ग्रामीण
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन
गुजर, युवक - विद्यार्थी काँग्रेस जिल्हा समन्वयक तथा शहर
काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, युवक काँग्रेस
जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, कार्याध्यक्ष राहुल उगले,
सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, सोमेश्वर दिवटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप
शेळके, नगर तालुका काँग्रेस अध्यक्ष संपतराव मस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, युवक काँग्रेस
अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट आदींनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या