Ticker

6/Breaking/ticker-posts

शहरातील उड्डान पुलास क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे नाव द्यावे

  हुजन सेवा संघ व फिनिक्स फाउंडेशनची मागणी








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

अहमदनगर : - शहरातील चालू असलेल्या उड्डाणपुलास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बहुजन सेवा संघ व फिनिक्स फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आली आहे .

मागणीचे निवेदन बहुजन सेवा संघ व फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे  कार्यवाहीसाठी देण्यात आले आहे .

तरी जिल्हा प्रशासनाने या होणाऱ्या उड्डान पुलास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याची तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी बहुजन सेवा संघ व फिनिक्स फौंडेशन व इतर सामाजिक संघटनांनी केले आहे .

अहमदनगर शहरांमध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली . अहमदनगर येथेच शिक्षण घेऊन त्यांनी ही कामगिरी केली . असे महान कार्य अहमदनगर शहरात घडल्यामुळे त्यांचे नाव देणे उचित होईल याची सर्वांना खात्री आहे, असेही बोरुडे यांनी म्हटले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या