जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी केला आरतीचा सत्कार
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
टाकळी मानुर : - तालुका क्रिकेट खेळाच्या विकासासाठी व ग्रामीण खेळाडू घडवण्यासाठी एस. व्ही क्रिकेट ऑकाडमीचे योगदान महत्वपूर्ण असून आरती केदार यांच्या रूपाने राष्ट्रीय पातळीवर महिला क्रिकेट संघात झालेली निवड ही सर्वांना अभिमानस्पद आहे आरतीने भविष्यात भारताच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चांगली कामगिरी करून गावाचा व तालुक्याचा लौकिक वाढवावा असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी केले .
तालुक्यातील हाताळा येथील आरती केदार हिची जयपूर येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सीनियर महिला संघात निवड झाल्याबद्दल ढाकणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या .यावेळी क्रिकेट अकॅडमचे प्रमुख व आरतीचे प्रशिक्षक शशिकांत नि-हाळी, पोपट केदार, माजी सरपंच अनिल ढाकणे उपस्थित होते .
पुढे बोलताना ढाकणे म्हणाल्या की. तालुक्यात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत अनेकांनी विविध प्रकारच्या खेळामध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी बजावली मात्र क्रिकेटच्या महिला खेळाच्या प्रकारात आरती ही तालुक्यातील पहिली खेळाडू ठरली आहे .आरतीने कष्टपूर्वक सराव करत राज्याच्या संघात स्थान मिळवले पाहिजे .तिचे प्रशिक्षक निराळी यांचेही त्यासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले जयपूर येथे होणारी स्पर्धा राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची पाहिजे असून आरतीने महाराष्ट्राच्या संघाकडून चांगली कामगिरी करावी व आपले स्थान पक्के करावे . ग्रामीण भागात मूलभूत सुविधा नसतानाही तिने मेहनतीने व संघर्षातून यश प्राप्त केल्याने ती कौतुकास पात्र आहे .
0 टिप्पण्या