* हैदराबाद मध्ये बाळ बोठे पोलिसांच्या ताब्यात........
* १० वाजता पोलीस अधीक्षक घेणार पत्रकार परिषद...
*नगरच्याच पोलिसांनी पकडले…
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. या हत्येत पाच जणांना अटक झाली आहे. मुख्य संशयित बाळ बोठे हा हत्येच्या दुसऱ्या दिवसापासून पसार होता. त्याविरुद्ध पोलिसांनी स्टॅंडिंग वॉरंट काढले होते. त्याला न्यायालयाने फरार घोषित केले होते. 9 एप्रिलपर्यंत बोठे हजर न झाल्यास त्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई देखील करण्यात येणार होती. न्यायालयाने तसे आदेशात म्हटले होते. नगरच्या पोलिसांनी बोठे याला अटक केल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
गेल्या काही दिवसापासून बोठे याला अटक झाल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु वरिष्ठ पातळीवर त्याला दुजोरा मिळत नव्हता. आज झालेली कारवाई मोठी आहे. बोठे याला कशी अटक झाली? कोठे अटक झाली? याचा माहिती पोलीस अधीक्षक दहा वाजता देणार आहेत. बोठे पसार होऊन नव्वद दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत. या काळात तो कुठे कुठे होता? कोणाच्या संपर्कात होता? बोठे ज्यांच्या संपर्कात होता त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे का? याबाबत पोलीस काय भूमिका घेतात याची माहिती या पत्रकार परिषदेत स्पष्ट होईल.
0 टिप्पण्या