Ticker

6/Breaking/ticker-posts

'एलआयसी'नं केवळ 'पीएम केअर्स'लाच निधी का दिला? लोकसभेत विरोधकांचा प्रश्न

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 

नवी दिल्ली : 'पीएम केअर्स' निधीवरून कोंग्रेस आणि सत्ताधारी पक्षामध्ये लोकसभेमध्ये सोमवारी खडाजंगी झाली. जनतेला फायदे देण्याऐवजी 'एलआयसी'ने 'पीएम केअर्स'ला निधी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर कुटुंबाने 'राजीव गांधी फाउंडेशन ने चीनकडून निधी स्वीकारल्याबद्दल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी टीका केली.

 प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये काँग्रेसचे नेते रवनीत सिंग यांनी सरकारने लादलेल्या लॉकडाउन काळात स्थलांतरित मजुरांचे आणि गरिबांचे हाल झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, 'एलआयसी'ने केवळ 'पीएम केअर्स'ला निधी दिला, असे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अनुराग ठाकूर यांनी उत्तर देताना सांगितले, की मजुरांचे हाल कमी व्हावेत, यासाठी लॉकडाउन काळात सरकारने पावले उचलली. अनेकांनी निवृत्तिवेतनाची पूर्ण रक्कम, काहींनी 'मनरेगा'तून मिळालेले उत्पन्नही 'पीएम केअर्स'ला दिले आहेत. मात्र, या देशातील एका कुटुंबाने 'राजीव गांधी फाउंडेशन'ची स्थापना केली आणि त्याला चीनकडूनही निधी स्वीकारला. पंतप्रधान निधीलाही या पक्षाने कधी प्राधान्य दिले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या