Ticker

6/Breaking/ticker-posts

मुख्यमंत्र्यांच्या घरात पुन्हा 'कोरोना 'ची 'एन्ट्री..!'

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबईः पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या घरात पुन्ह्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. रश्मी ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी क्वारंटाइन झाल्या असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच जेजे रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना शनिवारी २० मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे, की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना आवाहन केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबात दोघांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. राज्यात आणि मुंबईत गेल्या काही दिवसापासून कोरोना संसर्गाने उचल खाल्ली असून राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि हात धुणे या गोष्टी करण्याचा आग्रह देखील त्यांनी जनतेकडे धरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या