Ticker

6/Breaking/ticker-posts

इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड स्पर्धेत सुशील पुरी जिल्ह्यात प्रथम

 













लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर :-  सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनने माहे सप्टेंबर २०२० मध्ये घेतलेल्या इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड स्पर्धेत लोणी येथील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक विद्यालयाचा इयत्ता नववीचा विद्यार्थी सुशील राजेंद्रकुमार पुरी याने जिल्ह्यात प्रथम तर, महाराष्ट्र व गोवा राज्यात १८ वा क्रमांक पटकावला तसेच भारताच्या पश्चिम विभागातून तो ४९ वा आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने ९८ वी रँक प्राप्त केली.

चिरंजीव सुशील हा अहमदनगर येथील एमआयडीसी उपनगरातील गजानन कॉलनी येथील रहिवासी आहे. सोनई येथील निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पांडवपुरी गोसावी यांचा तो नातू तर, व्यावसायिक राजेंद्रकुमार पुरी व प्राथमिक शिक्षिका सौ.मेघना पुरी यांचा सुपुत्र आहे. 

त्याच्या यशाबद्दल माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, कमांडंट कर्नल डॉ.भरतकुमार, प्राचार्य राजेश महागडे आदींनी त्याचे खास अभिनंदन व कौतुक केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या