विद्युत वाहिण्यांंचे नुतरणाची मागणी,शेतकर्यांनमध्ये भिती
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
आठवड :- नगर तालुक्यातील आठवड
येथील शेतकरी नानाभाऊ धोंडीबा मोरे वय ७o हे आपल्या कांद्याच्या शेतात
पाणी देत असताना अचानक विद्युत वाहिनीची तार तुटून अंगावर पडल्याने मोरे यांचा
जागीच मृत्यू झाला.
याबाबत समजलेली माहिती
अशी की नानाभाऊ धोंडीबा मोरे हे त्यांच्या मालकीच्या शेतात कांद्याच्या पिकाला
पाणी देत असताना दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास विद्युत वाहून नेणारी तार
अचानकपणे तुटुन मोरे यांच्या अंगावरती पडल्याने विजेचा शॉक लागुन त्यांचा मृत्यू
झाला सदरील घटना शेजारील शेतकर्याच्या मुलाने पाहिली त्यांनी लगेच गावकऱ्यांना
याबाबत माहिती दिली त्यानंतर गावकऱ्यांनी महावितरण ऑफिशी संपर्क करून विद्युत
पुरवठा बंद केला. मोरे यांना गावकऱ्यानी तातडीने अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात
दाखल केले माञ मोरे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
विद्युत वाहून येणाऱ्या
बहुतांशी तारा ह्या जुन्या आहेत १९७२ ते १९८० या वर्षातील विद्युत वाहिण्यांंचे
नुतनीकरणाचे काम हाती घेतल्यास असे प्रकार घडणार नाहीत,चिचोंडी
पाटील परिसरातील विद्युत वाहिण्या तुटण्याचे प्रकार यापुर्वीही घडले आहेत,माञ यात कोणतीही जिवितहाणी झाली नव्हती. दरम्यान विद्युत वाहिनी
ओहरलोड मुळे गरम होऊन तुटली असावी यामुळे कदाचित अपघात
घडला असावा.याबाबत महावितरण कडून घटनेचा कार्यवाही सुरू आहे नेेेमके काय कारण आहे
हे चौकशीनंतरच समजेलअसे चिचोंडी पाटीलचे वीज अभियंता कमलेश पवार यांनी संगितले.
0 टिप्पण्या