Ticker

6/Breaking/ticker-posts

'जलयुक्त शिवार'ची चौकशी 'आपल्या' जिल्ह्यातुन सुरु ; अधिकाऱ्यांची धावा-धाव..!



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

अहमदनगर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी आपल्या म्हणजेच नगर जिल्ह्यापासुन सुरु केली असुन ही समिती काल नगरला आली होती. कोणत्या कामाची चौकशी करायची याची शिफारस ही समिती करणार आहे. त्यासाठी लोकांच्या तक्रारी आणि कागदपत्रे तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र त्याचीच माहिती समितीला मिळाली नसल्याने अध्यक्ष संतापले.  या समितीसमोर संबधित प्रशासनाचा अनागोंदी कारभार उघड झाला. हवी ती माहिती सादर करू न शकलेल्या अधिकाऱ्यांची समितीचे अध्यक्ष बीजयकुमार यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

 पूर्वी नगर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या बिजयकुमार यांचा रुद्रावतारच यावेळी पहायला मिळाला. असे निष्काळजीपने वागला तर चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाईल, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.  
जलयुक्त शिवार अभियानाची माहिती देण्यासाठी आपल्याला वेळ लागतो, कागदपत्र सापडत नाहीत, चौकशी केली तर सगळाच अनागोंदी कारभार आहे, आम्ही कोणाला दोषी ठरवायला आलेलो नाही. जर तुमचे डोळे उघडणार नसतील तर हा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाईल व तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, त्यामुळे तुम्ही चौकशी समितीला सहकार्य करा, अशी सूचनाही त्यांनी केली.

नगरचे जिल्हाधिकारी 
राजेंद्र भोसले, सदस्य संजय बेलसरे, सदस्य सचिव एन. टी. शिसोदे यावेळी उपस्थित होते. अध्यक्ष बीजयकुमार यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची माहिती घेऊन कोणा-कोणाचे तक्रार अर्ज आलेले आहेत त्याची माहिती मागवली. कृषी विभागाकडे तक्रारीची माहिती नसल्यामुळे त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. तक्रारदाराचे अर्ज तुमच्याकडे नाहीत तर तुम्ही परस्पर कशी चौकशी केली व कसा अहवाल पाठवला, असे ते म्हणाले. समितीने आपल्याला सर्व माहिती जमा करून आम्हाला सादर करा, असा आदेश दिला होता तरीही तुम्ही माहिती घेऊन येत नसाल तर काय उपयोग? तुम्हाला जर त्याचे गांभीर्य नसेल तर काही उपयोग नाही. समितीने असा चौकशी अहवाल जर वर पाठवला व तुमची एसीबी चौकशी झाली तर काय असते ते कळेल. कामाचे आराखडे व नकाशे हे जर तुम्हाला आणायचे नसेल व दाखवायचे नसतील तर काय उपयोग? तुम्हाला आम्ही सर्व कामे व्हिडिओद्वारे दाखवा, असे सांगितले परंतु तेही दाखवू शकत नसाल तर काय उपयोग? असे म्हणत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

मला कामामध्ये गुणवत्ता पाहिजे आहे ही माझी भूमिका आहे तसेच तुम्ही कागदपत्रं मला दाखवा म्हणजे मला सर्व माहिती कळेल. जर तुम्हाला त्याचं गांभीर्य नसेल तर तुम्हाला चौकशीला सामोरे जावे लागेल, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. यासंबंधी आलेल्या तक्रारींचे निरसन झाले आहे की नाही याची सुद्धा खातरजमा आम्ही करणार आहोत असे ते म्हणाले. समितीच्या पहिल्याच बैठकीत या योजनेशी संबधित प्रशासनाचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. ही कामे जुनी आहेत. त्यावेळी असलेले अधिकारी आता बदलून गेले आहेत. नव्या अधिकाऱ्यांना त्याची फारशी माहिती नाही, कागदपत्रे उपलब्ध नाहीत, असे प्रकारही आढळून आले. चौकशीला कशा प्रकारे सामोरे जावे असा प्रश्न अधिकर्याना पड्ला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या