गौरवनगर, फकीरवाडा येथे बंदपाईप गटार कामास सुरुवात
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर : -शहरामध्ये विकासकामे होत असताना ती दर्जेदार व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. विकासकामांचे नियोजन करुन कामे करणे
गरजेचे आहे. कारण ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. जमिनीअंतर्गत सर्व कामे मार्गी लागणे
गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून
बंदपाईप गटार कामे व जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर
गौरवनगर, फकीरवाडा येथे बंदपाईप गटार कामे सुरु आहेत. ठेकेदार काम
करीत असताना नागरिकांनीही
आपले कर्तव्य समजून कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने
शहरामध्ये सुरू असलेल्या कामाच्या दर्जेकडे लक्ष
केंद्रीत करावे, असे
प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
गोरवनगर, फकीरवाडा येथे बंदपा्ईप गटार कामाची पाहणी करताना आ. संग्राम जगताप. यावेळी विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक समद खान, उद्योजक अमोल गाडे, ओंकार देशमुख, संभाजी पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमोल गाडे म्हणाले की, गौरवनगर, फकीरवाडा
येथे दाट लोकवस्ती आहे. या भागातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न मार्गी लागावे. यासाठी अहमदनगर
महानगरपालिका व आ. संग्राम जगताप
यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे या भागाच्या विकासकामासाठी मोठा निधी
प्राप्त झाला आहे. यापुढील काळातही विकासकामे
मार्गी लागणार आहे. प्रभाग क्र. ४ च्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले.
0 टिप्पण्या