Ticker

6/Breaking/ticker-posts

राणादाच्या पाठक बाई म्हणतायत, ‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना?’

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगलामालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अक्षया घराघरात पोहोचली. खरं तर अंजलीपेक्षा पाठकबाईहीच तिला मिळालेली खरी ओळख. राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अगदी काहीच महिन्यांपूर्वी ही मालिका ऑफ एअर गेली आहे. मात्र, तरीही चाहत्यांच्या मनातील अंजली बाईआणि राणा दायांच्याबद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाहीये. मालिका ऑफ एअर गेल्यानंतर अंजली बाईअर्थात अभिनेत्री अक्षया देवधर फिटनेसकडे वळली. सध्या तिचे सोशल मीडियावरील काही व्हिडी खूप चर्चेत आहेत  

 

अक्षया सध्या स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत असून, जिम ट्रेनिंग आणि व्यायामाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. इतकेच  नव्हे तर या दरम्यान तिने तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली आहे. सध्या ती तिच्या मैत्रिणींबरोबर धमाल करताना दिसते. असाच एक व्हिडीओ अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती मैत्रीणींसोबत हम है नये, अंदाज क्यू हो पुराना? या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय अक्षया

अक्षया देवधर सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते. ती तिचे वेगवे
गळ्या लूकमधील फोटो सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना थोडीशी कल्पना दिली होती.

यात व्हिडीओत ती एकदम अत्यंत हटके अंदाजात दिसत होती. एरव्ही पडद्यावर साडी किंवा ड्रेसमध्ये दिसणाऱ्या अंजली बाईंनी अर्थात अक्षया देवधर या व्हिडिओत पायात हाय हिल्स सॅन्डल घालताना, हातात अंगठी व कानातदेखील ड्रेसला मॅचिंग कानातलं घालताना आणि मेकअप करताना दिसली होती. या लूकमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आणि त्याला लवकरच येतेय! असं कॅप्शन दिलंय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या