Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतकरी सन्मान योजनेतील वंचित शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा- खा.सुजय विखे पा.

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नवी दिल्ली:- शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत  वंचित शेतकऱ्यांना तातडीने निधी मिळण्यासाठी आवश्यक ते  बदल संगणक प्रणाली मध्ये करावेत अशी आग्रही मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची लोकसभेत केली.

 
यावेळी बोलताना खासदार डॉ विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू केलेली शेतकरी सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी पहाट आणणारी आहे . या सन्मान निधीचा अनेक शेतकऱ्यांना  लाभ झालेला असून  कोरोनाकाळात शेतकऱ्यांना मोठा आधार  देणारी ही योजना ठरली आहे . कुठलाही मध्यस्ती विना थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणारी या योजनेचा लाभ अनेक खातेदारांना झाला आहे. मात्र शेतकरी सन्मान निधी च्या अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या   संगणक प्रणाली मध्ये काही तांत्रिक   अडचणी निर्माण होत आहे.

शेतकऱ्यांची माहिती भरतांना खाते नंबर , आधार नंबर  इत्यादी बाबींची पूर्तता न झाल्यामुळे जवळपास 30 टक्के शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत .अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील  वंचित शेतकऱ्यांची  माहिती आवश्यक त्या दुरुस्त्या करून भरली गेली आहे .  मात्र ते आवश्यक ते बदल करून सुद्धा  शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित आहेत. केंद्र सरकारने यात तातडीने लक्ष घालून संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात अशी आग्रही मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभेत केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या