Ticker

6/Breaking/ticker-posts

बंद पडलेले सिग्नल तात्काळ सुरू करा ,अन्यथा आंदोलन

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर :- शहरातील बरेच  सिग्नल बंद अवस्थेत असून तेथे पोलिस देखील कधीच दिसत नाहीत, यासंदर्भात युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली आहे , वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्या भेटीनंतर आता मनपा आयुक्त शंकर गोरे यांना युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या  निवेदन देऊन सदरचे सिग्नल तात्काळ सुर करावेत अशी मागणी करण्यात आली आहे

शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे व त्याने अनेक अपघात देखील होत आहेत,व नागरिकांना वाहतुकीच्या बाबत कुठली शिस्त दिसत नाही याचे कारण बंद पडलेले ट्राफिक सिग्नल व तेथे उपस्थित नसलेले पोलीस कर्मचारी महानगरपालिकेने त्वरित वाहतूक शाखेला ट्रॅफिक सिग्नल दुरुस्त करून ते सुरुळीत सुरू करून द्यावेत अन्यथा युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. रिजवान अहमद, डॉ. बागल, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, शुभम शिर्के, शंकर जगताप, आकाश साळवे, आशिष गुंदेचा प्रकाश सामलेती, विशाल कळमकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या