Ticker

6/Breaking/ticker-posts

मानवी हक्क : प्रत्येकाने जागरूक रहावे -अ‍ॅड. भानुदास होले

 राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. महेश शिंदे यांची फेरनिवडी बध्दल सत्कार




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर :- मानवी हक्क, अधिकार व कर्तव्य याबाबत प्रत्येकाने जागरूक रहावे. आपल्या कर्तव्य व अधिकाराचा विसर पडल्यास मानवी अधिकाराची पायमल्ली होते. नागरिकांच्या न्याय, हक्कासाठी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे जिल्ह्यात उत्तमपणे कार्य सुरु असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांनी केले. 

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली) अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. महेश शिंदे यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा जुन्या न्यायालयाजवळ त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. होले बोलत होते. याप्रसंगी अ‍ॅड. अमोल जाधव, अ‍ॅड. पोपट चव्हाण, अ‍ॅॅड.गौरी सामलेटी, अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, संतोष कांडेकर, पोपटराव बनकर, अ‍ॅड. छाया निमसे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप लोंढे यांनी व अ‍ॅड. प्रशांत साळुंके यांनी शिंदे यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीच्या फेरनिवडीचे पत्र दिले. सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, सलग तिसर्‍या वर्षी संघटनेने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन मोठा विश्‍वास दाखविला आहे. या विश्‍वासाला तडा जाऊ न देता मानवधिकाराच्या रक्षणासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा कार्यकारणी जाहीर करुन प्रत्येक तालुक्याची कार्यकारणी निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल शिंदे यांचे शहर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भुषण बर्‍हाटे, अ‍ॅड. बाबासाहेब रणसिंग, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. दिलीप शिंदे, अ‍ॅड. सुरेश लगड, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, अ‍ॅड. सुनील तोडकर यांनी अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या