Ticker

6/Breaking/ticker-posts

बाळ काही बोलेना .. ; मोबाईलच 'लॉक'ही खोलेना !

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पारनेर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यामागे नेमका काय उद्देश होता ? फरार झाल्यापासून बोठे कुठे राहिला? त्याला सहकार्य कोणी केले? आयपॅड मोबाईल फोन लॉकचा कोड काय? यावर बोठेचं उत्तर एकच "मला काही आठवत नाही" पोलिसांनी न्यायालयाकडूनही दोनदा पोलिस कोठडी मिळवूनही बोठे काही बोलायलाच तयार नाही. रेखा जरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठेच्या पारनेर न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असल्याने न्यायालयासमोर बोठेला हजर केल्यानंतर पोलिस आणखी पोलिस कस्टडी मागणार का ? त्यावेळी न्यायालय पोलिस कस्टडी देणार की न्यायालयीन कस्टडी देणार आहे ? हे आज स्पष्ट होणार आहे.

जरेया हत्याकांडात बोठे हा सुमारे सव्वातीन महिने फरार होता. हैदराबाद येथून त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी पोलिस तपासात मात्र, बोठे सहकार्य करीत नसल्याचे समोर आले आहे. बोठेच्या आयपॅड,मोबाईल फोन मधून बरीच माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी लॉक बाबत विचारणा करूनही त्याला लॉक आठवत नाही.पोलिसांनी त्यासाठी मुंबई सायबर सेलच्या पोलिस पथकाला पाचारण करूनही हे लॉक उघडले गेले नाही. त्यामुळे पोलिसांनी बोठेचा मोबाईल  व या प्रकरणात त्याला मदत करणारा त्याचा मित्र तनपुरे व अन्य सात मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. याची तपासणी फॉरेन्सिक लॅब करणार आहे.

जरे यांच्या हत्येची सुपारी सागर भिंगारदिवेला दिली होती. ही सुपारी 12 लाखाची असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पैशाचा व्यवहार कशा पद्धतीने झाला याचा सुद्धा तपास अंतिम टप्प्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजते.तसेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणाऱ्या वस्तूचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अनेक गोष्टींचा उलगडा होणार असून पोलिसांच्या हाती धागेदोरे मिळणार आहेत. 

रेखा जरे हत्याकांड प्रकरणांमध्ये पोलिसांनी सहा आरोपींना पकडले असले तरी अजून कोणाचा या गुन्हात समावेश आहे काय ? याचीसुद्धा माहिती आता पोलिस बोठेकडून घेत आहेत. जरे यांचा खुन सुपारी देऊन झाल्याने व त्यात पैशाचे व्यवहार झाल्यामुळे हे व्यवहार कोणी, कसे व कोणामार्फत केले, याचा तपास सुरूच आहे.

पोलिसांनी बोठेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे थेट पैशाचे व्यवहार कशा पद्धतीने झाले याचाही उलगडा आता लवकरच होणार आहे. बोठेच्या घरातून अनेक वस्तू या गुन्हात पैशाचा व्यवहार कशा पद्धतीने झाला, याचासुद्धा तपास पूर्णत्वाकडे गेलेला आहे. जरे हत्याकांड प्रकरणांमध्ये अजून कोणाचा समावेश आहे, याचीसुद्धा माहिती आता घेतली जात आहे. त्यातच पैशाचे व्यवहार झाल्यामुळे हे व्यवहार कोणी, कसे व कोणामार्फत केले, याचा तपास सुरू झाला आहे. गेल्या तीन महिन्यापासून पोलिसांनी रेखा जरे यांच्या हत्याकांडाबद्दल जे जे काही पुरावे आहेत, ते गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ४० हून अधिक जणांचे जबाब घेतल्यामुळे पोलिसांच्या हाती अनेक माहिती आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या