शनिशिंगणापुरात शनिअमावस्या यात्रेला शुकशुकाट
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
कोरोना
संसर्गाची स्थिती लक्षात घेवून शनिशिंगणापुर येथील शनिअमावस्या यात्रा रद्द
केल्यानंतरही आज दिवसभरात तुरळक
भाविकांनी हजेरी लावली होती. देवस्थान ट्रस्ट व पोलिस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवत
मंदीर परीसरात कुणासही प्रवेश दिला नाही.
शनिअमावस्येला होणारी गर्दी लक्षात
घेता व्यावसायिक आपली पुजा साहित्य , स्टेशनरी व इतर दुकाने यात्रेच्या आगोदरच सजवून ठेवतात या यात्रा काळात
मोठ्या प्रमाणात आर्थिक ऊलाढाल होत असते , दरवर्षी होणारी
लाखोंची उलाढाल यंदा ठप्प झाल्याचे पहावयास मिळाले.शनी मंदिर बंद आल्यामुळे
यावेळेस दुकानदारामध्ये उत्साह नव्हता व सर्वच व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात
आर्थिक तोटा सोसावा लागला.परिसरातील,गावातील ग्रामस्थ,
युवक अमावस्येला रस्त्याच्या बाजूस छोटीमोठी दुकाने,चहा नाष्टा हाॅटेल लॉजिंग, फुले हार,तेल व्यवसायिक ,वाहतूकदार ,रिक्षा
चालक,सर्वांना फटका बसला.प्रत्येक शनी अमावस्येला अंदाजे सात
आठ कोटी रुपयांची ऊलाढाल या ठिकाणी होत असते याचा फायदा छोट्या मोठ्या
व्यवसायिकांना,शेतकऱ्यांना,परिसराला
होत असतो.
शनिशिंगणापूर
देवस्थान ट्रस्ट ला यात्रा काळात भाविकाकडून दानपेटीत देवस्थान विकास कामासाठी
निधी जमा होत असतो ,त्याच बरोबर तेल विक्री ,प्रसाद विक्री यातून उत्पन्न देवस्थानला होत असते यंदा देवस्थानलाही याचा
मोठा फटका बसला.
0 टिप्पण्या