( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर :अंभोरा येथील सौ.मुक्ताबाई चंद्रभान आमले पा. यांचे नुकतेच वयाच्या 105 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर गावातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पंचक्रोशितील नागरिक उपस्थित होते.
स्व.मुक्ताबाई आमले पा. यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक घटनांविषयी त्यांचा अभ्यास होता. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. नगर, माळीवाडा येथील साईप्रभा मेडिकलचे संचालक जालिंदर आमले पा. यांच्या त्या मातोश्री होत.
0 टिप्पण्या