लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्लीः आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक
करण्याची अखेरचा दिवस ३१ मार्च आहे. २०१९ पासून इनकम टॅक्स डिपार्टमेंट ने आधार
आणि पॅन लिकिंगला बंधनकारक केले होते. याची डेडलाइन बऱ्याचदा वाढवण्यात आली आहे.
आता ३१ मार्च २०२१ आधार - पॅन कार्ड लिंक करण्याची अखेरची तारीख आहे.
आधार कार्ड पॅन कार्डला लिंक कसे करायचे
याची माहिती तुम्हाला दिली आहे. जर अजूनही तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केले
नसेल तर तुम्हाला चांगला मोठा दंड बसू शकतो. जाणून घ्या सविस्तर...
Aadhaar- PAN लिंकची सविस्तर माहिती
केंद्र सरकारने आधी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक
करण्यात उशीर करणाऱ्यास १ हजार रुपये लेट फीस चार्ज केली होती. नवीन सेक्शन २३४ एच
फायनान्स बिल, लोकसभेत
मंजुरीसाठी आले होते. यानुसार, या दोन्ही डॉक्यूमेंट्सला
लिंक न केल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. हे लेट फी एक निष्क्रिय
पॅन कार्ड लावण्यात येत असलेली पेनल्टी पेक्षा वेगळी असणार आहे.
इनकम
टॅक्स डिपार्टमेंट ने आधीच हे स्पष्ट केले होते. की, जर अखेरची डेडलाइन पर्यंत या
दोन्ही डॉक्यूमेंट्सला लिंक करण्यास अयशस्वी राहत असला तर तुमचे पॅन कार्ड
निष्क्रिय होईल. म्हणजेच कार्ड कुठेही काम करणार नाही. उदाहरणासाठी ५० हजार
रुपयांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन, नवीन बँक अकाउंट आणि
शेयर्स खरेदी व विकण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. यासाठी तुम्ही लवकरात लवकर
आधार लिंक करा.
याशिवाय, हे स्पष्ट झाले आहे की, पॅन कार्ड धारकांना इनकम
टॅक्स अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे. म्हणजेच निष्क्रिय पॅनकार्डधारकांना नॉन पॅन
कार्ड होल्डर मानले जाईल. तसेच इनकम टॅक्स अॅक्ट अंतर्गत सेक्शन २७२ बी अंतर्गत १०
हजार रुपयांपर्यंत पेनल्टी आहे.
0 टिप्पण्या