नागापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षका
दादा घोलप यांच्या प्रामाणीकपणाचे सोशल
मिडीयातून कौतूक
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
याबाबतची माहिती अशी, की तालुक्यातील खारेकर्जुने येथील हॉटेल व्यावसायिक गंगाधर गाडे यांनी स्वतःचे वाहनाची विक्री केली. सत्तर हजार रुपयांची रक्कम बॅगमध्ये घेऊन ते नागापूर - निंबळक परीसरातून जात होते. खराब रस्त्यावरून जात असतांना त्यांच्या पैशांची बॅग खाली रस्त्यावर पडली. खडबडीच्या रस्त्यावर खाली पडलेली बॅग त्यांच्या लक्षात आली नाही. काही वेळाने राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नोकरीला असलेले प्राथमिक शिक्षक दादा घोलप व बंडू भोर हे त्याच रस्त्याने जात होते. त्यांना ही बॅग सापडली. दुसरीकडे गंगाधर लांडे यांना पुढे गेल्यानंतर बॅग हरवल्याचे लक्षात आले. त्यांना धक्काच बसला.
लांडे
यांनी परतीचा प्रवास करत परीसरात पैशांच्या बॅगेची शोधाशोध सुरू केली. पैशांची बॅग
न सापडल्याने ते हताश झाले होते. दरम्यान दादा घोलप यांना लांडे यांची पैशांची बॅग
हरवल्याचे समजले. घोलप यांनी लांडे यांना हरवलेली बॅग व त्यातील नोटांचा तपशील
विचारला. खातरजमा केल्यानंतर घोलप यांनी लांडे यांना पुर्ण रकमेसह बॅग लांडे यांना
दिली. आनंदी झालेल्या लांडे यांनी घोलप यांना रोख बक्षीस स्विकारण्याची विनंती
केली. घोलप यांनी बक्षीसाची रक्कम स्विकारण्यास नम्रपणे नकार दिला. घोलप
गुरुजींच्या या प्रामाणिकपणा व दिलदारपणामुळे लांडे यांचे मन भरून आले. घोलप
गुरुजींच्या यांच्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्वामुळे समाजात शिक्षकाची पत आणखी
उंचावली अशी भावूक प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाचे
धडे देणा-या गुरुजींनी तो प्रत्यक्षात कृतीतून दाखवत समाजसमोर आदर्श ठेवला आहे. घोलप गुरुजींच्या या प्रामाणिकपणाची बातमी सोशल मिडीयातून फिरू
लागल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या