Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगर महानगरपालिका : 685 कोटींचे अंदाजपत्रक स्थायीला सादर; आज सभा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर:- अहमदनगर महानगरपालिकेचे सन 2021-2022 चे 684 कोटी 89 लाखांचे मुळ अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांचेकडे आयुक्त शंकर गोरे यांनी सादर केले.

सादर केलेल्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न रु. 305  कोटी 95 लाख, भांडवली जमा रु. 332  कोटी 63 लाख धरणेत आले आहे. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी 40 कोटी 50 लाख रुपये, संकलीत करावर आधारीत करापोटी 53 कोटी 24 लाख, जी एस टी अनुदान 103 कोटी 40 लाख व इतर महसुली अनुदान 9 कोटी 33 लाख रुपये, गाळा भाडे 3 कोटी, पाणीपट्टी 22 कोटी, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी 42 कोटी, संकीर्णे 9 कोटी इ. महत्वाच्या बाबीसह महसुली खर्च 255 कोटी 24 लाख धरण्यात आला आहे. तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरुन 385 कोटी 71 लाख रुपये अंदाजित जमा होणार आहेत.

तसेच खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर 122 कोटी, पेन्शन 38 कोटी, पाणी पुरवठा विज बिल 31 कोटी 50 लाख, स्ट्रीट लाईट विज बिल 6 कोटी 50 लाख, शिक्षण मंडळ वर्गणी 4 कोटी, महिला व बाल कल्याण योजना 51 लाख, अपंग पुनर्वसन योजना 51 लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना 1 कोटी 52 लाख, मा. सदस्य मानधन 1 कोटी 80 लाख, औषधे व उपकरणे 60 लाख, सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी 6 कोटी 11 लाख, कचरा संकलन व वाहतूक 5 कोटी, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 70 लाख, टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी 1 कोटी 82 लाख, अशुध्द पाणी आकार 2 कोटी, विविध वाहने खरेई 1 कोटी 85, नविन रस्ते 1 कोटी 75 लाख, रस्ते दुरुस्ती 1 कोटी 75 लाख, इमारत दुरुस्ती 40 लाख, शहरातील ओढ नाले साफसफाई 41 लाख, आपत्कालीन व्यवस्थापन 40 लाख, कोडवाड्यावरील खर्च 20 लाख, वृक्षारोपन तदनुषंगिक खर्च 20 लाख, हिवताप प्रतिबंधक योजना 35 लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी 2 कोटी 50 लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त 1 कोटी 10 लाख यासह इतर बाबींवर खर्च करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे शासनाकडून प्राप्त विविध कामांसाठीच्या निधीची मनपा हिस्स्याची रक्कम भरणे प्रस्तावित आहे. अमृत योजनेतील पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, सोलर प्रकल्प, भाजी मार्केट जागा विकसीत करणे, नाट्यगृहचे बांधकाम पूर्णत्वास नेणे, तसेच शासकीय योजना पूर्ण करणे व शहरातील विविध भागांचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

यावेळी आयुक्त  शंकर गोरे, उपायुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, मुख्यलेखाधिकारी प्रविण मानकर, नगरसचिव शाहजहान तडवी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदींसह स्थायी समिती सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या