लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर रस्त्यावर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पहिला पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता, तो म्हणजे स्कॉर्पिओ पार्क करतानाचं सीसीटीव्ही फुटेज. ज्या व्यक्तीने कार पार्क केली होती, तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला होता. त्याने मास्क घातला होता, तर डोके हुडीने झाकलेले होते. त्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नव्हती.
मात्र हाच
प्रश्न आज 4 दिवसानंतर सुद्धा कायम आहे. केंद्रीय तपास
यंत्रणा सुद्धा या प्रकरणी चौकशी करत आहे. मात्र
त्यांच्या हाती सुद्धा अद्याप काही लागलं नाही. काल 'जैश उल
हिंद' या संघटनेच्या माध्यमाने टेलिग्रामवर एक पोस्ट करून या
प्रकरणाची जबाबदारी घेण्यात आली. मात्र संध्याकाळ पर्यंत 'जैश
उल हिंद'ने हे कृत्य केलं नसून आमच्या नावाचा वापर केल्याची
एक पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
काल जैश उल हिंद या संघटनेनं त्यांच्याकडून अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यासंदर्भात जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे मग या संघटनेचं नाव घेऊन पोलिसांना चकवा देण्याचं तर काम नाही ना असाही सवाल उपस्थित होतोय.
0 टिप्पण्या