Ticker

6/Breaking/ticker-posts

10 हजार दंडापासून वाचायचंय, पॅन कार्ड अपडेट करा; 31 मार्च ही शेवटची संधी..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली: पॅन कार्ड (Pan Card) आता अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक बाबींसाठी हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. पॅन कार्ड आता बंधनकारक करण्यात आलेय. 31  मार्च 2021 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला जोडले जाणे आवश्यक आहे. आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. तसेच आधारला पॅन कार्ड जोडलेले नसले आणि तरीही त्याचा कुठे उपयोग केल्यास दंडसुद्धा होऊ शकतो. हा दंड 10 हजार रुपये इतका असू शकतो.

कलम 272 बी अंतर्गत दंड आकारला जाणार

पॅन-आधार लिंक करण्याची मुदत सरकारने 31 मार्च 2021 रोजी निश्चित केली. आतापर्यंत ज्यांनी पॅनला आधारशी जोडले नाहीये, त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावे. पॅन कार्ड आधारशी जोडले नाही तर ते निष्क्रिय होते. निष्क्रिय पॅन वापरल्याबद्दल प्राप्तिकर कलम 272B अंतर्गत 10000 रुपये दंड आकारला आहे. प्राप्तिकर विभागाने यासाठी यापूर्वीच अधिसूचना जारी केलीय.

आधार कार्ड लिंक आहे की नाही असे तपासा

आपला पॅन-आधार लिंक करणे तपासले जाऊ शकते किंवा नाही. आपण प्राप्तिकर अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकता. वेबसाईटवर ई-फायलिंगच्या टॅबवर जाऊन हे तपासले जाऊ शकते. येथे फक्त पॅन आणि आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागतो. नवीन टॅबमध्ये याची माहिती मिळेल.

आपले पॅन कार्ड कसे जोडावे

आयकर विभाग incometaxindiaefiling.gov.in ची अधिकृत वेबसाईट उघडा.
*  येथे तुम्हाला लिंकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
*  त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये टाका.
*  कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.
*  सर्व बॉक्स भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.
*  पॅन कार्ड आपल्या आधार क्रमांकाशी जोडले जाईल. पॅन किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करताना कोणतीही चूक होणार नाही याची खबरदारी घ्या.
*  पॅन कार्डला कॉमन सर्व्हिस सेंटरमधील आधारशी लिंक देखील करता येईल.
*  पॅन कार्ड एसएमएसच्या माध्यमातून देखील जोडले जाऊ शकते
पॅन-आधार लिंक करणे देखील मेसेजद्वारे करता येते. त्यासाठी कॅपिटल लेटरमध्ये UIDPN टाइप करा आणि त्यानंतर जागा देऊन आपला 12 अंकी आधार क्रमांक द्या आणि त्यानंतर स्पेस देऊन 10 अंकी पॅन नंबर टाइप करा. हा एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवा.

निष्क्रिय पॅन वापरू नका

आपले पॅन निष्क्रिय असल्यास ते वापरू नका. वापरल्यास दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. मूल्यांकन वर्ष 2019-20 साठी उशिरा मिळकत कर विवरण भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. उशिरा रिटर्न भरल्यामुळे ही फायलिंग दंडासह केली जाईल. परंतु जर आपला पॅन भरताना देखील निष्क्रिय केले असेल तर दंड दुप्पट होईल.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या