लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया
राबवण्यात आली. विशेष म्हणजे इतर बँकांना एका बँकेत विलीन करण्याची प्रक्रिया
अद्यापही सुरू आहे. मोठ्या बँकेत बर्याच लहान बँकांचा समावेश केला जात आहे.
यामुळे 1 मार्चपासून अनेक बँकांचा
Ifsc Code बदलण्यात
आलेत. त्याचबरोबर हा बदल अनेक बँकांमध्ये 1 एप्रिलपासून लागू
होणार आहे. म्हणजेच अनेक बँकांचे आयएफएससी कोड (Bank New Ifsc Code) 1 एप्रिलपासून बदलणार आहेत आणि यात कॅनरा बँकेच्या नावाचाही समावेश आहे.
आपले कॅनरा बँकेत खाते असल्यास किंवा जर आपली बँक कॅनरा बँकेत विलीन होणार असेल तर
आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
बर्याच बँकांचे आयएफएससी कोड
बदलले जाणार
सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन होणार आहे, ज्यामुळे बर्याच बँकांचे आयएफएससी कोड बदलले जातील. हा नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होईल. जर आपले यापूर्वी सिंडिकेट बँकेत खाते असेल तर
आपला कोड बदलेल, म्हणून आपल्याला नवीन कोड माहीत असणे आवश्यक
आहे. अशा परिस्थितीत बँकेने नवीन आयएफएससी कोडदेखील जारी केलेत, जे आतापासून आपले नवीन आयएफएससी कोड असतील.
प्रत्येक बँकेच्या शाखांच्या
आधारे यादी जारी
कॅनरा बँकेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रत्येक शाखांच्या आधारे यादी
जारी केलीय. यामध्ये सर्व सिंडिकेट बँकांच्या शाखांचे आयएफएससी कोड देण्यात आलेत, जे बदलणार आहेत आणि बँकेने नवीन कोडही दिलेत. आपल्याला एक नवीन कोड मिळणार
आहे. अशा परिस्थितीत आपण आपला नवीन आयएफएससी कोड कसा जाणून घेऊ शकता हे आपल्याला
माहिती आहे.
बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनी
असा चेक करावा IFSC कोड
बँक ऑफ बडोदाच्या आयएफएससी कोडमध्येही बदल झाला/. वास्तविक, ई-विजया आणि देना बँकेचा आयएफएससी कोड या बँकेत विलीन झालाय. बँक ऑफ
बडोदाने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, नवीन आयएफएससी
कोड मिळवणे खूप सोपे आहे. यासाठी बँकेने एक सोपा मार्गही सांगितला आहे. ग्राहकाने
नवीन कोडसाठी बँकेच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी किंवा संदेशाचा आधार घेण्यास
सांगितले. बँकेने यासाठी टोल फ्री क्रमांकही दिलाय, जो 18002581700
आहे. नवीन आयएफएससी कोडसाठी 8422009988 हा
मोबाईल नंबर बँकेने दिलाय.
पंजाब नॅशनल बँकेतही बदल होणार
पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि
युनाइटेड बँक ऑफ इंडिया यांचे जुने चेकबुक आणि आयएफएससी किंवा एमआयसीआर कोड बदलणार
आहेत. जरी जुने कोड 31 मार्चपर्यंत कार्यरत राहतील, परंतु बँकेने आपल्या ग्राहकांना नवीन कोड मिळवायला सांगितलेय नाहीतर नंतर
समस्या येऊ शकतात. पीएनबीने 31 मार्चपर्यंत नवीन आयएफएससी
कोड आणि चेकबुक मिळविण्यासाठी ग्राहकांना ट्विटद्वारे माहिती दिलीय.
0 टिप्पण्या