Ticker

6/Breaking/ticker-posts

1 एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी 5 तास कामाचे आणि पीएफ वाढणार, केंद्राची योजना

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली: जर तुम्ही नोकरी करत असाल तर 2021-22 म्हणजेच 1 एप्रिल 2021 या नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुमच्यासाठी मोठे बदल होऊ शकतात. या बदलांनंतर आपला  पीएफ, वर्किंग अव्हर्स आणि पगार असे बरेच नियम बदलणार आहेत. याशिवाय तुमची ग्रॅच्युइटी आणि पीएफही वाढेल. ग्रॅच्युइटी आणि पीएफच्या वाढीसह आपला हातात येणारा पगार कमी होणार आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकातील नियमानुसार या बदलांवर अजूनही चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी संसदेत वेतन विधेयक आले होते, त्यावेळी त्यावर चर्चासुद्धा झाली होती. या विधेयकाची यंदा 1 एप्रिल 2021 पासून अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या, कोणत्या प्रकारचे बदल घडू शकतात.

 

नवीन नियमांमधील बदल 10 टप्प्यांद्वारे समजून घ्या

*सरकारी योजनेनुसार 1 एप्रिलपासून मूळ पगार (सरकारी नोकऱ्यांमध्ये मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता) एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
* केंद्र सरकारचा असा दावा आहे की, पगाराच्या या बदलामुळे कंपनी आणि कामगार दोघांनाही फायदा होईल.
* नवीन नियमांनुसार तुमच्या पीएफमध्ये वाढ होईल. त्याच वेळी आपला इनहँड पगार कमी होईल. वास्तविक नवीन नियमांनुसार मूलभूत पगार एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक असावा.
* या बदलांनंतर बहुतेक नोकरदार लोकांची पगाराची रचना पूर्णपणे बदलू शकते. मूलभूत पगाराच्या वाढीमुळे पीएफमध्ये वाढ होईल. कारण ते मूलभूत पगारावर आधारित आहे.
* जास्तीत जास्त कामकाजाचे तास वाढवून 12 करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला. या व्यतिरिक्त ओव्हरटाईममध्ये 15 ते 30 मिनिटे अतिरिक्त काम समाविष्ट करण्याची तरतूद आहे.
* सध्या तुम्ही 30 मिनिटांपेक्षा जास्तीचे काम केले तर ते ओव्हरटाईममध्ये मोजले जात नाही.
*नवीन नियमांनुसार सतत 5 तासांपेक्षा जास्त काम करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. कर्मचार्‍यांना 5 तास काम करून अर्ध्या तासाचा ब्रेक द्यावा, असं सरकारला वाटतं.
* पीएफ रकमेच्या वाढीबरोबर सेवानिवृत्तीची रक्कमही वाढेल. सेवानिवृत्तीनंतर लोकांना या रकमेमधून बरीच मदत मिळेल.
* पीएफ आणि ग्रॅच्युइटी वाढल्याने कंपन्यांची किंमतही वाढेल, कारण त्यांनाही कर्मचार्‍यांना पीएफमध्ये अधिक वाटा द्यावा लागेल.
* गेल्या वर्षी संसदेत वेतन विधेयक संहिता संमत झाल्यामुळे हे बदल होऊ शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या