Ticker

6/Breaking/ticker-posts

SBI चं ग्राहकांना गिफ्ट; फक्त ‘या’ नंबरवर मिस कॉल देऊन मिळवा कर्ज

 





लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी सरकारी बँक वेळोवेळी आपल्या ग्राहकांना प्रत्येक माहिती देत ​​असते. मग तो फसवणूक टाळण्याचा सल्ला असो किंवा कोणतीही योजना, एसबीआय ग्राहकांना मेसेज पाठवून अलर्ट देत असते. स्टेट बँक ऑफ इंडिया आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि    ग्राहकाना मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या नव्या ऑफर आणि सेवेसंदर्भात माहिती देत असते. आता एका मिस कॉलनं आपल्याला कर्जे घेता येणार आहे. आता ग्राहक मिस कॉल देऊनही वैयक्तिक कर्जे घेऊ शकतात. एक मिस कॉल देऊन आपण वैयक्तिक कर्ज कसे मिळवू शकता याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्विटनुसार, ग्राहक आता 7208933142 या क्रमांकावर मिस कॉल करून कर्ज मिळवू शकतात. एखाद्या ग्राहकाने या नंबरवर कॉल करताच त्याला बँकेचा परत कॉल येईल आणि आपल्या कर्जाची प्रक्रिया सुरू केली जाईल.


तुम्हाला SMS द्वारेही कर्ज मिळू शकते

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार ग्राहक त्यांच्या टोल फ्री क्रमांकावर 1800-11-221 वर कॉल करून वैयक्तिक कर्जाशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, जर आपल्याला SMS द्वारे कर्ज हवे असेल तर आपण SMS मध्ये PERSONAL लिहून 7208933145 वर एसएमएस पाठवू शकता. एसएमएस पाठवताच तुम्हाला बँकेचा कॉल येईल आणि तुमच्या कर्जाची पुढील प्रक्रिया सुरू होईल.


आपण या सेवा देखील घेऊ शकता

मिस्ड कॉलच्या सेवेद्वारे आपण केवळ वैयक्तिक कर्जच घेऊ शकत नाही, तर शिल्लक रक्कम तपासण्यासाठी, मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी आणि इतर महत्त्वपूर्ण कामांची माहिती मिळवू शकता. कर्ज बाजारात वाढती स्पर्धा पाहता ही सुविधा देशातील बऱ्याच मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांविषयी बोलताना पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा यांसारख्या बँकासुद्धा ही सुविधा पुरवतात. त्याचबरोबर खासगी बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांच्यासह अनेक बँका मिस कॉलची सुविधा देतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या