लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई :-देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या
निवासस्थानाबाहेर गुरुवारी रात्री स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. या
घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात बुधवारी रात्री ही गाडी मुकेश
अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्याचे समोर आले होते.
एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून ही गोष्ट समोर आली होती.
त्यामध्ये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बुधवारी मध्यरात्री एक वाजता स्कॉर्पिओ
आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती.
ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्यानंतर चालक गाडीतून उतरला आणि
इनोव्हा गाडीत बसून निघून गेला
एका
दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून ही गोष्ट समोर आली होती. त्यामध्ये मुकेश अंबानी
यांच्या घराबाहेर बुधवारी मध्यरात्री एक वाजता स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन
गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी मुकेश अंबानी
यांच्या घराबाहेर पार्क केल्यानंतर चालक गाडीतून उतरला आणि इनोव्हा गाडीत बसून
निघून गेला.
या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला अंबानी
यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या गाडीत काही नंबरप्लेटसही मिळाल्या. या नंबरप्लेटस
नक्की कशासाठी होता याचा उलगडा होऊ शकलेला नाही.
1) MH 04 DN 9945
गाडीचा नंबर ठाणे आरटीओ रजिस्ट्रेशनचा आहे. पण या नंबरवरुन तपासणी
केली असता गाडीचे पुर्व मुंबई आरटीओ मधून रजिस्ट्रेशन केले असून गाडी “कोलंबिया एम्बसी, परदेशी गाडी” असं रजिस्ट्रेशन मध्ये नमूद करण्यात आलय हा गाडी
12 वर्षे जुनी असून रजिस्ट्रेशन मध्ये गाडी पांढऱ्या रंगाची
ह्युंदाई वेरना गाडी असल्याचे सांगण्यात आले आहे. गाडीचे रजिस्ट्रेशन लकी डी या
मुलूंडमधील व्यक्तीच्या नावाने करण्यात आले आहे.
2) MH 01 BU 6510
गाडीचा
नंबर मध्य मुंबई आरटीओमध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालक एक
अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपनीच्या नावे असल्याचे नमूद असून गाडी सहा वर्षे
जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ
असल्याचे RTO रजिस्ट्रेशनमध्ये नमूद केले आहे.
3) MH 01 CZ 7239
गाडीचा
नंबर मध्य मुंबई आरटीओ मध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालकाचे
नाव रजिस्टर मध्ये निशांत सुर्वे असे नमूद करण्याच आले आहे आणि गाडी ही हिरव्या
रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढ-या रंगाची जॅग्वार रेंज रोवर असल्याचे रजिस्टर
मध्ये नमूद आहे
4) MH 01 DK 9945
या गाडीचा नंबरदेखील मध्य मुंबई आरटीओ मध्ये रजिस्टर असल्याचे नमूद
करण्यात आले असून गाडी मालक एक अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपणीच्या नावे
असल्याचे नमूद असून गाडी १ वर्षे जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून
पांढ-या रंगाची रेंज रोवर गाडी आहे असं RTO रजिस्ट्रेशन
मध्ये नमूद आहे. मात्र, या नंबरप्लेटसचे वाहतूक विभागाकडे (RTO)
असलेले रेकॉर्ड तपासल्यावर चक्रावणारी माहिती समोर आली आहे.
0 टिप्पण्या