लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) रविवारी रात्री 12 वाजल्यापासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल.
एनएचएआयने यापूर्वी 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय दिला होता. नंतर त्याची मुदत दीड महिन्याने वाढवण्यात आली होती. मात्र आता FASTag च्या अंमलबजावणी मुदतीला पुढे ढकलले जाणार नसल्याचे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले त्यामुळे रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावरील कॅशलेन बंद ठेवण्यात येणार आहेत. कोणताही वाद होऊ नये म्हणून टोल प्लाझावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.
FASTag मध्ये मिनिमम बॅलन्सची गरज नाही
FASTag खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट काढून टाकली आहे. यापुढे FASTag खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज भासणार नाही. टोल प्लाझावर ट्रॅफिक जामची परिस्थिती उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ प्रवासी वाहनांसाठी FASTag चे नियम बदलण्यात आले आहेत. व्यावसायिक वाहनांसाठी अद्याप जुना नियम लागू आहे. FASTag च्या खरेदीदरम्यान, प्रवासी वाहनांच्या जसेकी कार, जीप, व्हॅनसाठी सिक्युरिटी म्हणून काही शिल्लक ठेवणे बंधनकारक होते.
कुठे उपलब्ध होईल FASTag
जर आपण अद्याप आपल्या वाहनावर FASTag स्टिकर लावले नसेल तर तुम्हाला ते लवकरच लावले पाहिजे. पेटीएम, अॅमेझॉन, स्नॅपडील इत्यादींकडून FASTag खरेदी केलं जाऊ शकतं. तसेच, देशातील 23 बँकांच्या माध्यमातून FASTag उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त रस्ते वाहतूक प्राधिकरण कार्यालयातही FASTag ची विक्री केली जाते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) त्यांच्या उपकंपनी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) च्या माध्यमातूनही FASTag ची विक्री करते.
टोल प्लाझावरुन जात असताना ड्रायव्हरच्या FASTag रिचार्ज नसल्यास वाहनांना टोलवर थांबावं लागत होतं. यामुळे टोल प्लाझावर ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. पण आता असं होणार नाही. टोल प्लाझा पार केल्यानंतर, जर आपल्या खात्यात उणे शिल्लक राहिली असेल तर, बँक सिक्युरिटी मनी वसूल करू शकेल, जे वाहन मालकास पुढील रिचार्जवर भरावे लागेल.
0 टिप्पण्या