लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्लीः सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड (CCL
Recruitment 2021) ने बर्याच पदांसाठी अर्ज मागविले आहेत. ही भरती अॅप्रेंटिस भरती होत आहेत. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी 21 फेब्रुवारी 2021
पर्यंत अर्ज करावे. ऑनलाईन अर्ज करणे या पदांवर वैध असतील. या
पदांवर नोकरीसंबंधित पूर्ण माहिती वेबसाईटवर दिलेली आहे. आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील इत्यादी माहिती देण्यात आली.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीखः 01 फेब्रुवारी 2021
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी
2021
तपशील
अॅप्रेंटिस
482 पदं
वेतन
दरमहा 6000
वयोमर्यादा
या पदांसाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे
आणि कमाल वय 21 वर्षे असावे. तसेच यासाठी कोणतंही अर्ज शुल्क
भरावे लागणार आहे. अर्ज निःशुल्क आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण केलेली असावी. अधिक
माहितीसाठी संबंधित वेबसाईटला भेट द्या. इच्छुक उमेदवार www.centralcoalfields.in
या वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे होईल.
IOCL अंतर्गत एकूण 346 पदांची
भरती
IOCL Recruitment 2021: जर आपण एखादी नोकरी शोधत असाल
तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ((Indian Oil Corporation
Limited, IOCL) ने अॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी
केलीय. IOCL अंतर्गत एकूण 346 पदांची
भरती करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवार IOCL
https://iocl.com/ च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू
शकतात. त्याच वेळी या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च
2021 आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,
याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
भारतीय नौदलात 1159 पदांवर भरती
भारतीय नौदलाकडून (Indian NAVY) ट्रेड्समॅनच्या
पदांवर जागा रिक्त (Tradesman Vacancy) करण्यात आल्याची
माहिती आहे. सैन्यात सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक खास संधी आहे. 1159
पदांवर ही भरती होणार आहे. यासाठी 22 फेब्रुवारी
2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अर्ज
करण्यासाठी, तुम्ही joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता.
0 टिप्पण्या