लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
वाडेगव्हाण -पाडळी रांजणगाव ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांची निवड झाली तर उपसरपंचपदी वैशाली देवराम करंजुले यांची निवड करण्यात आली.
अध्यासी अधिकारी सोपान शिंदे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीत नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेण्यात आली. सरपंच पदासाठी विक्रमसिंह कळमकर व उपसरपंच पदासाठी वैशाली करंजुले यांचा एकमेव अर्ज शिल्लक रहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे अध्यासी अधिकारी सोपान शिंदे यांनी जाहिर केले.
सोपान शिंदे यांना ग्रामविकास अधिकारी सौ. गिरी मॅडम, तलाठी संतोष मांडगे यांनी सहाय्य केले. या नूतन पदाधिका-यांचे अभिनंदन आमदार नीलेश लंके, बाबाजी तरटे, अशोक सावंत बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड आदींनी केले आहे.
___________________________
0 टिप्पण्या