( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
या निवेदनात म्हटले आहे की दीड वर्षापूर्वी येथे
लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसविले होते गावात येणारे प्रमुख रस्ते, नगर औरंगाबाद महामार्ग
व संवेदन ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले होते जेणेकरून घोडेगाव ग्रामपंचायत
प्रशासन व सोनई पोलिसांना गावातील घडामोडी थेट पाहता येऊन अनुचित प्रकारांना आळा बसेल
परंतु सद्यस्थितीत ही यंत्रणाच बंद पडून कुचकामी ठरली आहे घोडेगावात बसविलेले ८ ते
१० सीसी टीव्ही कॅमेरे मेंटेनन्स न केल्यामुळे काही दिवसातच बंद पडले तसेच या व इतर
कॅमेऱ्यांचे चित्रीकरण सेव्ह करणारे डीव्हीआर मशीनही घोडेगावातील पोलीस चौकीतून गायब
झालेले असताना पोलिस यंत्रणेचे सफशेल दुर्लक्ष होत असल्याचा लेखी आरोप ग्रामपंचायत
व दक्षता समितीने या लेखी निवेदनातून केलेला आहे कॅमेर्यांचे बंद पडलेबाबत यापूर्वीही
अनेक वेळा सोनई पोलिसांना तोंडी कळविण्यात आले.
कॅमेरे कंत्राटदारानेही
दुरुस्ती कामात दुर्लक्ष केले तसेच मराठी शाळेसमोर उड्डाणपुलाजवळ असलेले दोन कॅमेरे
चोरीला गेलेले आहेत. निवेदनात पुढे म्हटले आहे की गेल्या काही दिवसापासून घोडेगावात
चोरट्यांचा सुळसुळाट आहे भरवस्त्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ते पाच ठिकाणी घरफोड्या,
धाडसी चोर्या झाल्या, घरातून सोन्याचे दागिने गेले, दुसऱ्या घटनेत घरासमोरून दुचाकी
मोटरसायकल तर तिसऱ्या घटनेत रोकड रक्कम चोरली गेली, रस्त्यावरची पानटपरी फुटली गेली
तर एका होमगार्डचे घरात चोरी झाली या व अनेक चोरयांचा तपास लागलेला नाही व एवढे होऊनही
सीसीटीव्ही बंद असल्याने ग्रामस्थ चोरट्यांच्या दहशतीखाली आहेत आधीच मनुष्यबळ कमी तरी
घोडेगावचे सुरक्षेची जबाबदारी सोनई पोलिसांवर आहे पोलीस चौकी असून तेथे चोवीस तास पोलिस
कर्मचारी नसतो त्यामुळे गावकर्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे निवेदनात म्हटले असून
कॅमेरे यंत्रणा पूर्ववत सुरु व्हावी व गावात झालेल्या चोरीच्या घटनांचा तपास लावावा
अशी मागणी सीसीटीव्ही दक्षता समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
0 टिप्पण्या