Ticker

6/Breaking/ticker-posts

भारजवाडीमध्ये महिलाराज ..! सरपंचपदी सौ.आशाबाई बटुळे, उपसरपंचपदी सौ.चंद्रकला खाडे

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

भगवान गाॅमविकास  पॅनलने मारली बाजी

खरवंडी कासार:-   भारजवाडी ग्रा. पंंंच्या सरपंचपदी आशाबाई माणिक बटुळे व उपसरपंचपदी सौ. चंद्रकला अजिनाथ खाडे यांची बिनविरोध निवड झाली. भारजवाडी गाव हे भगवान गडाजवळ असून या गावाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती . 


या निवडणुकीमध्ये माणिक बटुळे यांनी  बाजी मारली . विविध स्तरातून त्यांचे कौतुक व   अभिनंदन होत आहे.  यावेळी भारजवाडी गावातील नागरिकांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 


यावेळी माणिक बटुळे म्हणाले की . भारजवाडी गावच्या नागरिकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे , तो मी सार्थक ठरवू व गावाच्या विकासासाठी वेगवेगळया योजना राबवून सर्वांच्या सहकार्याने गावाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या