लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
मुंबई :
छत्रपती शिवाजी
महाराजांची काल जयंती. जयंती उत्सवासाठी शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर मोठा
उत्साह पाहायला मिळाला. मोजक्या लोकांच्या
उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राजकीय कोट्या देखील केल्याचं समोर आलं. यात
विशेष चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या डोळ्याच्या भाषेची.
त्याचं झालं असं की, आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भाषणात अजित दादांचं कौतुक करताना म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांना सात भाषा यायच्या. त्यापैकी एक भाषा म्हणजे डोळ्याने ते मावळ्यांना सांगायचे. त्यांची सांकेतिक खूण मावळ्यांना योग्य सूचित करायचे. आत्ता अशी भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार वापरतात. बेनकेंनी असं म्हणताच अजित दादांनी हात जोडले.
मास्क हीच
आपली ढाल : मुख्यमंत्री ठाकरे
मुख्यमंत्री म्हणाले की, माझं हे दुसरं वर्ष आहे. हा बहुमान
जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळं लाभलेलं आहे. आता
कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, वातावरण छान आहे, पण तोंडावर मास्क आहे.
महाराजांच्या काळातील युद्ध आपल्याला करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपलं युद्ध
सुरू आहे. यासाठी आपली ढाल म्हणजे मास्क आहे. नुसती तलवार हातात घेतली म्हणजे
युद्ध जिंकता येत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, काही साप आहेत. ते वळवळ
करतायेत, त्यांना ठेचायचं असतं आणि आपण पुढे जायचं असतं,
असं ते म्हणाले.
0 टिप्पण्या