Ticker

6/Breaking/ticker-posts

श्रीगोंदा तालुका :टाकळी कडेवळीत येथे धड नसलेला पुरुषाचा मृतदेह कुत्र्याने उकरून काढला.; खुनाचाच प्रकार ?

 

लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

श्रीगोंदा :- तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे एका पुरुषाचा धड नसलेला पुरुषाचा मृतदेह कुत्र्याने उकरून काढला. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह पुरला असण्याची प्राथमिक शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली. टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर असणाऱ्या माळरानावर आज (८) सायंकाळी कुत्र्यांनी एक मृतदेह उकरून काढला ही बाब आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली.

तहसीलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पुरलेला मृतदेह पुरुषाचा असून त्याचे मुंडके घटनास्थळी आढळुन आले नाही. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट असून राखाड्या रंगाची पॅन्ट आहे. मयत पुरुष उंच असून मजबूत शरीरयष्टी आहे. मृतदेहाचे धड घटनास्थळी आढळून आले नसल्याने हा खुनाचाच प्रकार असण्याची अधिक शक्यता आहे.दरम्यान या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हा मृतदेह खून करून पुरला का? या मृतदेहाला इथे  आणून पुरले? खुन झाला असेल तर कोणत्या कारणातून झाला या सर्व प्रश्नांची उकल पोलीस यंत्रणेला करावी लागणार आहे.।

अहवालानंतर अधिक स्पष्टता

दरम्यान घटनास्थळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर, डॉ. संघर्षशील राजुळे हे दाखल झाले आहेत.मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येणार आहे. श्रीगोंदा- पुढारी वृत्तसेवा

  तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे एका पुरुषाचा धड नसलेला पुरुषाचा मृतदेह कुत्र्याने उकरून काढला. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह पुरला असण्याची प्राथमिक शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.

टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर असणाऱ्या माळरानावर आज (८) सायंकाळी कुत्र्यांनी एक मृतदेह उकरून काढला ही बाब आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली. तहसीलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पुरलेला मृतदेह पुरुषाचा असून त्याचे मुंडके घटनास्थळी आढळुन आले नाही. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट असून राखाड्या रंगाची पॅन्ट आहे. मयत पुरुष उंच असून मजबूत शरीरयष्टी आहे. मृतदेहाचे धड घटनास्थळी आढळून आले नसल्याने हा खुनाचाच प्रकार असण्याची अधिक शक्यता आहे.

दरम्यान या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हा मृतदेह खून करून पुरला का? या मृतदेहाला इथे  आणून पुरले? खुन झाला असेल तर कोणत्या कारणातून झाला या सर्व प्रश्नांची उकल पोलीस यंत्रणेला करावी लागणार आहे.।

 अहवालानंतर अधिक स्पष्टता

दरम्यान घटनास्थळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर, डॉ. संघर्षशील राजुळे हे दाखल झाले आहेत.मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या