Ticker

6/Breaking/ticker-posts

रस्त्यावरील सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी - पो.नि.शशिकांत गिरी




( टाकळी खातगाव येथील हनुमान शैक्षणिक संकुलात रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त माहिती देताना पो.नि.शशिकांत गिरी,प्राचार्य साहेबराव कुलट,उपप्राचार्य संजय दुधाडे, हरिभाऊ चव्हाण, रावसाहेब नजन, जालींदर नवले, साहेबराव आहेर,पो. ना.शैलेश रोहोकले आदी छाया - दादा भालेकर)

लोकनेता न्यूज

 टाकळी ढोकेश्वर ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

रस्त्यावरून प्रवास करताना सर्वच रस्ता आपल्या मालकीचा असा भ्रम न बाळगता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करत रस्त्यावरील सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस निरिक्षक शशिकांत गिरी यांनी केले.
   टाकळी खातगाव येथील हनुमान शैक्षणिक संकुलात वाहतुक विभागाने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जनजागृती कार्यक्रमात श्री.गिरी बोलत होते.याप्रसंगी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य संजय दुधाडे होते.यावेळी प्राचार्य साहेबराव कुलट, हरिभाऊ चव्हाण, रावसाहेब नजन, जालींदर नवले, साहेबराव आहेर, पोलिस नाईक शैलेश रोहोकले, शशी वाघमारे, गणेश मुळे, परसराम तागड आदी उपस्थित होते.
  याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, रस्त्यावरील सुरक्षितता ही केवळ वाहतुक शाखेची जबाबदारी नाही तर ती सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी याची जाणीव ठेवली तर यातून मोठ्या प्रमाणात अपघात टाळता येवू शकतात.युवकांनी सामाजिक माध्यमांचा वापर समाजपयोगी कामासाठी केला पाहिजे.रस्त्या वरील अपघातात कोणतेही चित्रिकरण करण्या ऐवजी अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली तर त्याचा फायदा होवू शकतो.
     प्रा.दुधाडे म्हणाले की, युवकांनी आपल्या घरच्यांचे वाहतुक नियमाबद्दल जरी किमान प्रबोधन केले तरी मोठा बदल घडू शकतो.मिलींद थोरे यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या