लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
वाशी टोलनाक्यावर 2014 साली तोडफोड झाली होती. राज ठाकरेंना यापूर्वी 2018 आणि 2020 मध्ये समन्स काढण्यात आले होते. मात्र, त्यावेळी राज ठाकरे गैरहजर राहिले. त्यामुळे राज ठाकरेंना वॉरंट काढले गेले. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित होते. राज ठाकरेंना वॉरंट काढल्याने मनसेचे कार्यकर्ते वाशी टोलनाका परिसरात जमा झालेले चित्र पाहायला मिळाले.
मनसे प्रमुख राज ठाकरेंना जानेवारी महिन्यात वॉरंट बजावण्यात आले होते. मनसेच्या विधी व न्याय विभागाची फौज वाशी न्यायालय परिसरात दाखल झाली होती. राज ठाकरेंना जामीन मंजूर होणार असल्याची आशा अॅड. रविंद्र पाष्टे यांनी व्यक्त केली होती. मनसेच्या विधी विभागाचे वकील मोठ्या संख्येने वाशी न्यायालय परिसरात उपस्थित होते.
काय आहे प्रकरण ?
26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर वाशी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या संदर्भातील प्रकरणात न्यायालयाने जामिन मंजूर केला .
0 टिप्पण्या