Ticker

6/Breaking/ticker-posts

पैशाच्या कारणावरून जामखेड शहरात तरुणाचा खून .. !




पैसै कोठे ठेवले आहेत असे म्हणुन झाला हल्ला

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

जामखेड : - तीस वर्षीय तरुणास मोटारसायकल वर बसुन शहरातील खर्डा चौका जवळ आणले. व मारहाण करून अज्ञात हत्याराने अंगावर व डोक्यात मारून करुन त्याचा खुन करण्यात आला. या प्रकरणी मयत तरुणाच्या आईने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिडीत मुलाच्या आईने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या  फिर्याद म्हटले आहे की  दि 24 फेब्रुवारी ते दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या वाजण्याच्या सुमारास आमच्या लांबच्या नात्यातील आरोपी किरण उर्फ खंड्या रावसाहेब काळे रा. मिलिंद नगर, जामखेड याने माझा मुलगा दिगंबर जालिंदर काळे वय 30 वर्ष रा. चुंबळी यास माझी जाऊ सोजर कंठीलाल पवार  राहणार खंडोबा वस्ती जामखेड हिच्या घरातून पैसे कुठे ठेवले आहेत. असे म्हणून मारहाण केली. या नंतर त्याला मोटरसायकल वर बसवले व जामखेड शहरातील खर्डा चौकाच्या जवळील बाजूला माझा मुलगा दिगंबर यास घेऊन गेले. त्या ठिकाणी कोणत्यातरी हत्याराने डोक्यावर अंगावर मारून त्याचा खून केला आहे असे फीर्यादीत म्हंटले आहे.

या प्रकरणी पिडीत मुलाची आई मुक्ताबाई जालिंदर काळे, रा. राजेवाडी, यांनी दि 28 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी किरण उर्फ खंड्या रावसाहेब काळे, रा. मिलिंद नगर, जामखेड याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. राजू विश्वनाथ थोरात हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या