लोकनेता न्यूज
अ .नगर : गावठी हातभट्टी दारूच्या
अड्ड्यावर कारवाई करून चार हजार 300
लिटर कच्चे रसायन व 100 लीटर हातभट्टी दारू
असा दोन लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल नगर तालुका
पोलिसांनी जप्त केला आहे. नेप्ती व निमगाव वाघा या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अनिल टिल्लू पवार (रा. नेप्ती, ता. नगर), कुमार दादासाहेब फलके (रा. निमगाव वाघा,
ता. नगर) यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक
पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली. सानप यांनी आपल्या
पथकासह निमगाव वाघा येथे हातभट्टीवर छापा टाकून एक लाख 32 हजार
रूपये किंमतीचे दोन हजार 200 लिटर कच्चे रसायन जप्त केले. तर
नेप्ती शिवारात पवार वस्तीवर छापा टाकून दोन हजार 100 लिटर
रसायन, 100 लिटर दारू असा एक लाख 36 हजार
रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
0 टिप्पण्या