लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
तालुक्यात रानगव्याच्या हल्ल्यात एक जखमी , घबराट
जामखेड:- जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील गर्जे जायभाय वस्तीवर संध्याकाळी सहाच्या दरम्यान शेतात काम करीत आसतांना रानगव्यांच्या हल्ल्यात संतोष दराडे जखमी झाला असुन तालुक्यात बिबट्या पाठोपाठ रानगवाचे प्रथमच दर्शन झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
संतोष भिमराव दराडे जखमी
जामखेड तालुक्यातील वंजारवाडी शिवारात रानगव्याने शेतात काम करणाऱ्यां संतोष भिमराव दराडे यांच्यावर हला केला त्यामध्ये ते जखमी झाले असुन त्यांच्या डोक्यात जबर मार लागला आहे प्रसंगावधान राखल्याने जीव वाचला. जखमी ने फक्राबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. ग्रामस्थानी रानगवाचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेत तो निघुन गेला . बिबट्या , कोरोना अन् आता रानगव्याशी झुंजायची वेळ ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांवर ओढवली आहे यालाच म्हणतात "घरचं झालं थोडं..अन् व्याह्याने धाडलं घोडं ..! "
वन विभागाची टिम जामखेड वन परिमंडल अधिकारी अनिल खराडे वनरक्षक किसन पवार किशोर गांगर्डे ,प्रदीप उबाळे सुरेश भोसले वनमजूर ,शामराव डोंगरे, अंकुश गवळी ही टीम दाखल झाली व रानगवा असल्याची खात्री केली रात्र झाल्या मुळे ज्या दिशेने रानगवा गेला आहे त्या भागातील नागरीकाना जागरूक राहण्याचे सांगितले तसेच जखमी संतोष दराडे यांच्या वस्तीवर जाऊन विचारपुस केली वनविभाचे जामखेड वनपरिमंडळ अनिल खराडे यांनी टीम सोबत रात्रीच आपले कामकाज चालु केले आहे .
0 टिप्पण्या