Ticker

6/Breaking/ticker-posts

संत रविदासांनी मानवतेची शिकवण दिली -जालिंदर बोरुडे

 * संत रविदास महाराज जयंती रुग्णसेवेने साजरी

 * फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम





लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर :- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 143 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 38 रुग्णांची निवड करण्यात आली आहे. तर फाऊंडेशनने केलेल्या नेत्रदानाच्या आवहानाला प्रतिसाद देत 21 नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला.

संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वैभव दानवे, आर्यन कराळे, बाबासाहेब धीवर, किरण कवडे, सौरभ बोरुडे आदी उपस्थित होते.

जालिंदर बोरुडे म्हणाले की, संत हा एक जातीचा असू शकत नाही. संपुर्ण मानवजातीसाठी त्यांचे विचार व कार्य असतात. चौदाव्या शतकात संत रविदास महाराजांनी मानवतेची शिकवण दिली. या महापुरुषांच्या विचाराने समाजातील अनेक गरजू घटकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन विविध मोफत आरोग्य शिबीर घेत आहे. तर कोरोनाच्या संकटकाळात गरज ओळखून ही आरोग्यसेवा सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

गावातील संत सावता महाराज मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या या शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन सदर शिबीर पार पडले. गरजूंना अल्पदरात नंबरचे चष्मे देखील उपलब्ध करुन देण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांमध्ये अवयवदानाप्रती जनजागृती करण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या