( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
चिचोंडी पाटील:-नगर
तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चिचोंडी पाटील ग्रामपंचायत सरपंच व
उपसरपंच पदाची निवडणूक होऊन त्यामध्ये सरपंच पदासाठी झालेल्या तुळशीच्या निवडणुकीत
भाजपाचे नगर तालुका अध्यक्ष मनोज राधाकिसन कोकाटे १२ विरुद्ध ३ मतांनी विजयी झाले
तर त्यांचे विरोधी उमेदवार मनीषा ठोंबरे यांना तीन मते मिळाली. उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी
कल्पना भाऊसाहेब ठोंबरे यांना १२ मते पडून विजयी
झाल्या तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तू धुळे यांना ३ मते पडली. ग्रामपंचायत
कार्यालय चिचोंडी पाटील येथे झालेल्याअतिशय अटीतटीच्या व चुरशीच्या या निवडणुकीत
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाखा अभियंता शिवाजी राऊत यांनी काम पाहिले.
त्यांना ग्रामविकास अधिकारी मोरे यांनी सहाय्य केले.
चिचोंडी पाटील ग्रामपंचायत मध्ये एकूण पंधरा सदस्य
असून भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे अशी अभूतपूर्व युती पाहावयास मिळाली. या
युतीकडे १२ सदस्यांचे पाठबळ असून विरोधी गटाकडे केवळ ३ सदस्य आहेत. भाजपाचे तालुका
अध्यक्ष मनोज कोकाटे,पंचायत समिती नगर सभापती तथा इंजिनीयर
प्रवीण कोकाटे, नगर तालुका मार्केट कमिटीचे संचालक बाजीराव
हजारे, राष्ट्रवादीचे नगर तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे व
मनसेचे संदीप काळे एकत्रित येऊन या सर्वांनी मिळून बारा सदस्यांचे पाठबळ मिळवून
आघाडी केलेली आहे.
सरपंचपदी मनोज कोकाटे व उपसरपंच पदी कल्पना ठोंबरे
यांची निवड होताच वाद्य वाजवून, गुलालाची उधळण व फटाक्यांची
आतषबाजी करत समर्थक कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली व पावन गणपती मंदिरासमोर
विजयी सभा घेतली.सरपंच,उपसरपंच यांचे चिचोंडी पाटील
ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात आले. आघाडीतील अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत
व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते,ग्रामस्थ,पदाधिकारी उपस्थित होते. या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
0 टिप्पण्या