लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर: “मराठवाड्याचा शेजारील जिल्हा म्हणून नगर जिल्ह्यात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. करोना अद्याप गेलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरा, अन्यथा पोलीस दंड करणार आहेत. जर नागरिकांनी नियम पाळले नाहीत, तर शिथील करण्यात आलेले नियम कडक करण्यात येतील प्रसंगी लॉकडाऊनसारखा कठोर निर्णयही घ्यावा लागेल,” असा इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
लग्नासाठी परवानगी घेऊन त्यानुसार केवळ पन्नास जणांनाच निमंत्रित केले पाहिजे. आपल्या जिल्ह्यात लग्नासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे, ती टाळली पाहिजे. पन्नास जणांपेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय चालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून आपण मधल्या काळात नियमांमध्ये शिथीलता दिली होती. मात्र, त्याचा उलटा परिणाम होणार असेल तर पुन्हा कठोर कारवाई करावी लागणार आहे.
त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनसारख्या उपाययोजना टाळायच्या असतील तर प्रत्येकाने
काळजी घेण्याची गरज आहे. आम्ही आता यंत्रणा पुन्हा सक्रिय केली आहे. पोलीस,
महापालिका, आरोग्य विभाग पुन्हा एकदा
जोमाने कामाला लागले असून त्यांना पूर्वी नेमून दिलेली कामे आणि कडक अंमलबजावणी
करण्यास सुरुवात झाली आहे. लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणी करून घ्यावी आणि
सर्वांनीच नियम पाळावे,’ असे आवाहनही जिल्हाधिकारी भोसले
यांनी केले आहे.
0 टिप्पण्या