लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) .
अहमदनगर / श्रीगोंदा:- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे पुरण्यात आलेल्या मृतदेहाची
ओळख पटविण्यासह खून करणारे आरोपी निष्पन्न करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले
आहे. वारंवार शरीर सुखाची मागणी केल्याच्या कारणावरुन मृत रमेश जाधव यांचा
कोयत्याने वार करत खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान या खून प्रकरणात
मुख्य आरोपी एका महिलेसह ५ आरोपीना अटक करण्यात आली
असल्याची माहिती पोलिस सुत्रानी दिली.
८ फेब्रुवारी रोजी
टाकळी कडेवळीत शिवारात शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख
पटविण्याचे आव्हान श्रीगोंदा पोलिसांसमोर होते. दोन दिवसात मयताची ओळख पटवत संशियत
आरोपीपर्यत पोहचण्यात पोलिसांना यश आले. मुख्य आरोपी एका महिलेसह, तेजस बाळासाहेब भोसले, प्रशांत बजरंग साबळे, अमोल गोविंद कांबळे,( रा. माळेगाव)
, राजेश विठ्ठल गायकवाड ( रा. माझगाव, सातारा) या पाच आरोपीना अटक
करण्यात आली आहे.
या गुन्ह्याची
आरोपीनी कबुली दिल्याची माहिती असून, हकीगत अशी, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी अतिशय नियोजनबद्ध हा खून करण्यात आला. जाधव
यांच्यावर सुरुवातीला गावठी कट्यामधून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला मात्र
कट्यामध्ये गोळी अडकली गेल्याने आरोपी राजेश गायकवाड याने हातातील कोयत्याने
जोरदार वार करत मयत जाधव यांचे शीर धडा वेगळे केले.
मयत रमेश जाधव व मुख्य आरोपी महिला यांची मागील काही
दिवसांपूर्वी मॉर्निग वॉक करतेवेळी भेट झाली होती. भेटीतून दोघांचे मोबाईलद्वारे संभाषण सुरू झाले. त्यातच मयत
जाधव हा आरोपीकडे शरीर सुखाची मागणी करू लागला. याचा मनात राग धरून मुख्य आरोपीसह
इतर चौघानी रमेश जाधव यांचा खून करण्याचा कट रचला.
३१ जानेवारी रोजी आरोपी व मयत हे दोन चारचाकी वाहनातून
सायंकाळच्या सुमारास टाकळी कडेवळीत शिवारात आले. जमीन दाखविण्याच्या बहाण्याने
निर्जन ठिकाणी नेऊन त्यांचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीनी सोबत
टिकाव, खोरे सोबत आणले होते. दोन फूट उंचीचा खड्डा खोदून मयत जाधव
यांचा मृतदेह अंबालिका कारखाना परिससरात पुरला. त्याच रात्री आरोपीनी मयताची गाडी
पुणे- सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या एका घाटात लोटून दिली.
पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी तपासाची
चक्रे वेगाने फिरवत काही मयताची ओळख पटवत संशियत ताब्यात घेतले. त्यांच्याकडे
चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक
रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, विठ्ठल पाटील, पोलीस हवालदार अंकुश
ढवळे, दादासाहेब टाके, किरण बोराडे, अमोल कोतकर, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे,विनायक जाधव, संजय काळे, किरण जाधव, महिला पोलीस
कर्मचारी लता पुराणे यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत गुन्हा उघडकीस आणला.
तिघेच निघाले मास्टरमाइंड
मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्या महिलेचे संशियत म्हणून नाव
घेतल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेसह अन्य दोघांना ताब्यात घेतले होते पोलीस तपासात
त्या तिघांनी कुठलीच माहिती दिली नाही. पोलिसांनी सगळ्या पर्यायाचा अवलंब करूनही
ते गुन्ह्याच्या बाबतीत काहीच बोलत नव्हते. परवा मुंबई येथून दोघांना
ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. मुंबई येथे असणारे
आरोपी हेच गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीसांचा कयास होता मात्र पोलीस
चौकशीसाठी ताब्यात असणारे तिघेच या गुन्ह्याचे मास्टरमाइंड निघाले. या खुनामागे
आणखी वेगळे काही कारण आहे का ? पोलिस यंत्रणा त्या दृष्टीने तपास करत आहे.
0 टिप्पण्या